स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.06) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गुड वर्क, गोकुळपेठ नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हिमाक्ष पार्थ इंफ्रास्ट्रक्चर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच द जे. के. हॉटेल, मोहन, नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खोट्या पद्ध्तीने जमिनीचा सौदा केल्याप्रकरणी आरोपी सुशील यादववर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Thu Sep 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -खोट्या कागदपत्रांचे आधारे जमिनीचा एन ए ऑर्डर मिळविल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या घोरपड ग्रामपंचायत हद्दीतील शेत नं 148/अ/3 आराजी 1.94 हे.आर जमिनीचा विक्री करारनामा 2011 मध्ये आरोपीच्या वडिलांनी दिलीप आसवानी व इतर यांच्यासोबत केला होता याबाबत जाणीव असूनही आरोपीने फिर्यादी राजेंद्रसिंह यादव यांच्याशी त्याच जमिनीचा 24 जानेवारी 2017 रोजी विक्री करारनामा केला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com