नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार ता. 10) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे माहेश्वरी पंचायत भवन, 15, टेकडी रोड, सिताबर्डी, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. श्री जागृत बक्षी, अपना बाजार जवळ, सिताबर्डी यांच्यावर दुकानाचा कचरा रस्त्याच्या बाजुला टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शिवनाथ असोसिएटस प्रा. लि. यांच्यावर परवानगीशिवाय अनधिकृतपणे विद्युत खांबावर बॅनर/ होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ताज किराणा स्टोर्स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com