स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.31) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सतिश चंद्रा, सोमलवाडा, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. इंटेलिटोर्स प्रे स्कुल, भरत नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून 5हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्री हरी नगर – 2, ओंकार नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्मॉल वंडर प्रे स्कुल, मनिष नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून 5हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे नितिन सवालानी, गांजाखेत चौक, इतवारी, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. कुकु अथेमिक्स फॅक्टरी, शांती नगर, नागपूर यांच्यावर कारखान्याचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. दुर्गा अगरबत्ती शॉप, शांती नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

SYMPOSIUM ON IMPLEMENTATION OF AGNIPATH SCHEME BY AIR MARSHAL SURAJ KUMAR JHA, AOP, IAF AT HQ MC ON 31 JUL 23

Tue Aug 1 , 2023
Nagpur :- Air Marshal Suraj Kumar Jha, Air Officer-in-Charge Personnel, IAF spoke at the symposium on induction of Agniveervayu and related human resource management aspects at Headquarters Maintenance Command, Nagpur on 31 Jul 23. He was received by Air Marshal Vibhas Pande,Air Officer Commanding-in-Chief, HQ MC. During his address to the air warriors, Air Mshl SK Jha impressed upon the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!