नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.25) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. तेज उर्जा इंन्टरप्राईजेस, बुटी लेआऊट, नागपूर यांच्यावर बांधकाम साहित्याचा कचरा रस्त्याच्या कडेला पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. कलश आर्युवेदिक, राम नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शिवचरण बिल्डर्स, गणेश नगर, आजमशाह लेआऊट, नागपूर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. कराची हलवा, कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शंभु कँटीन, दिनशॉ फॅक्टरी, बोरगाव चौक नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.