नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.8) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून मे. बालाजी अपार्टमेंट, गजानन मदिर जवळ, तात्या टोपे नगर, नागपूर यांच्यावर 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे स्कॅलार्क प्रोपेर्टीस, बँक कॉलोनी, शागवन नगर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला.
नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे पुजा बिल्डर्स, मिरे लेआऊट, नंदनवन यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत इंडियन परफुम, प्रभाग 18, शिवाजी पुतळा, गांधीगेट महाल या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.