नागपूर :-एसएनजी बास्केटबॉल लीगच्या अंडर-१३ मुले गटातील रोमांचक सामन्यात बिलबोर्ड्स संघाने जोरदार पुनरागमन करत टीम टेकसचा २५-२३ असा निसटता पराभव केला. हाफटाइमला टीम टेकसने १२-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु दुसऱ्या सत्रात बिलबोर्ड्सने आपला वेग वाढवत १७-११ अशी सरशी साधली आणि दोन गुणांनी विजय मिळवला.
इतर एका अंडर-१३ मुले गटातील सामन्यात निपाणे हूपर्सने श्री हुंडाई संघावर १८-१० अशी मात केली. सचमन बेदीने ६ गुणांसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर पराभूत संघाकडून सोहम देवधरने ६ गुणांची नोंद केली.
इतर निकाल:
अंडर-१३ मुले गट:
बिलबोर्ड्स २५ (आदेश उमरेडकर १३ गुण) विरुद्ध टीम टेकस २३ (सौरभ मरस्कोळे ११ गुण)
निपाणे हूपर्स १८ (सचमन बेदी ६ गुण) विरुद्ध श्री हुंडाई १० (सोहम देवधर ६ गुण)
मुली गट:
हंसा गर्ल्स २३ (ज्ञानदा शैरे १७ गुण) विरुद्ध एसएसईएच फ्लायर गर्ल्स १० (वंशिका अग्रवाल ६ गुण)
बच्चा कंपनी गट:
बालगोकुलम २० (वंश दवडा १६ गुण) विरुद्ध निंजा २ (विस्मया २ गुण)
बालवीर १२ (अथर्व केकतपुरे ६ गुण) विरुद्ध डीपीएस मिहान ८ (नीव शाह ८ गुण)