स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार ता. 12) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे राम स्वर, लोकमत चौक, धंतोली, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. किड़स टाऊन, बाजी प्रभु, नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अचिव्हर्स लर्नींग सेंटर, बिनाकी, मंगळवारी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. रोहीत खुशलानी, के.के. नगर, जरीपटका, नागपूर यांच्यावर बांधकाम साहित्य साठवून ठेवल्यामुळे ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

...अक्षय भालेराव व हीना मेश्राम यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी देण्याच्या न्यायिक मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारला सामूहिक निवेदन सादर

Mon Jun 12 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव याची झालेली निर्घृण हत्या,हादगाव तह.अंतर्गत मातंग समाजाच्या वस्तीवर करण्यात आलेला जीवघेणा हल्ला,आणि मरिन ड्रॅईव्ह मुंबई येथील सावित्रीबाई फुले वस्तीगृह येथे हिना मेश्राम ह्या मुलीची छेड काढून हत्या करण्यात आली.या तिन्ही घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी कामठी शहर च्या वतीने आज तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्रीना सामूहिक निवेदन सादर करीत या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!