स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.23) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग न.5, राणी दुर्गावती चौक येथील साहु अगरबत्ती शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग न.31, गणेश नगर येथील अग्रवाल बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.लकडगंज झोन अंतर्गत शीतला मंदीर जवळील धरमनगर येथील सोनाली क्लीनिक यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत प्लॉट न.02, संत ज्ञानेश्वर नगर, झिंगाबाई टाकळी येथील M/s Moon Light Enclave यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठ के सामने स्थापित होगी छत्रपति शिवाजी की प्रतिमा

Fri Feb 24 , 2023
राजे शिव छत्रपति प्रतिष्ठान के समारोह में राजे मुधोजी भोसले ने दी जानकारी नागपुर :- रातुम नागपुर विद्यापीठ के सामने छत्रपति शिवाजी महाराज की सिंहासनारूढ़ प्रतिमा की स्थापना जल्द ही स्थापित होगी. यह जानकारी राजे मुधोजी भोसले ने दी जलद ही इस प्रतिमा स्थल का भूमिपूजन होगा. हाल ही में राजे छत्रपति प्रतिष्ठान द्वारा महल गांधीगेट पर आयोजित समारोह में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com