स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.16) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 20 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न.22, क्वेटा कॉलोनी, टेलिफोन एक्सचेंज चौक येथील भारत ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत मिठा निम दरगाह, सिव्हील लाईन्स येथील श्री इंदुरजी धारा यांच्याविरुध्द बांधकामाचे मीटर आणि डेब्रिक्सचा अपव्यय फुटपाथवर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अमरावती रोड येथील हायवे ग्लोरी हॉटेल यांच्याविरुध्द हॉटेलचा कचरा अनधिकृत ठिकाणी टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत प्लॉट न. 42, एसबीआय कॉलोणी, जाफर नगर येथील आसिफ जमाल यांच्याविरुध्द बोअरवेल खोदतांना चिखल आणि सांडपाणी रस्त्यावर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मार्कंडादेव येथे भारत सरकारच्या विविध योजनांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन

Fri Feb 17 , 2023
– खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार उद्घाटन – माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय,पुणे व क्षेत्रीय कार्यालय वर्धाचा उपक्रम गडचिरोली : भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय, पुणे, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, गडचिरोली व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या सहकार्याने दिनांक १७ फेब्रुवारी पासून २१ फेब्रुवारी पर्यंत चामोर्शी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!