स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.6) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न.08, टिमकी, मोमिनपुरा येथील चंदा डेयरी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत गोळीबार चौक, पाचपावली रोड येथील सहारे किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार यादीत नोंदणीसाठी प्रोत्साहीत करा - मुख्य निवडणूक अधिकारी

Tue Feb 7 , 2023
नागपूर : विद्यार्थी, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर मतदार यांना नियोजितरित्या मतदार यादीत नोंदणी करून घेण्याकरीता प्रोत्साहीत करा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील 18 ते 19 वर्षांच्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के मतदार नोंदणी होण्यासाठी जिल्ह्यातील एकूण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com