स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.23) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत क्वेटा कॉलनी येथील तकदिर आईस गोला यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत राणी दुर्गावती चौक येथील चिप्स शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न. 17, बारा सिग्नल, टिंबर मार्केट येथील मुंधरा मोटर्स यांच्याविरुध्द जवळच्या गटारात मोठया प्रमाणात कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.लकडगंज झोन अंतर्गत हिवरीनगर येथील कपील बिल्डर्स यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत बॅरामजी टाऊन येथील नानक लक्षरिया ग्रुप यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

BRAVEHEARTS WHO LOST THEIR LIVES IN SIKKIM ROAD ACCIDENT SENT OFF WITH FULL MILITARY HONOURS

Sat Dec 24 , 2022
 SIKKIM :-The mortal remains of all the sixteen Bravehearts who lost their lives in the tragic road accident at North Sikkim on 23 Dec 22 were sent off from Bagdogra Airport with full military honours. Honourable Chief Minister of Sikkim PS Tamang and Lt Gen VPS Kaushik, YSM, SM, GOC Trishakti Corps paid homage to the Bravehearts in a solemn […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com