स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.12) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली ‍ आणि आशीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 19 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील आनंद किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बंडु पत्तल या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न.03, टिपू सुलतान चौक येथील हाजी मुख्तार भाई किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत प्लॉट नं.14, राजकमल चौक,विश्वकर्मा नगर येथील नॅरॉथम सिंग चव्हान यांच्याविरुध्द रस्त्यालगत सिमेंट काँक्रीट टाकून सर्व्हिस रोडला अडथळा केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM congratulates Bhupendra Patel on taking oath as CM of Gujarat

Tue Dec 13 , 2022
New Delhi :-The Prime Minister,  Narendra Modi has congratulated  Bhupendra Patel on taking the oath as Chief Minister of Gujarat. In a tweet, the Prime Minister said; “Congratulations to  Bhupendra Patel on taking oath as CM of Gujarat. I would like to also congratulate all those who took oath as Ministers. This is an energetic team which will take Gujarat […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com