नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.7) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत न्यू शुक्रवारी, महाल येथील पारस डेअरी आणि जितेन्द्र ट्रेडर्स या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत भारत माता चौकी, इतवारी येथील ठाकुरदास जमनादास किराणा शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत धंतोली येथील Hair Clinic & Transplant Centre यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग नं.31, गणेशनगर येथील जैन संघटन मंडळ यांच्याविरुध्द कचरायुक्त पदार्थाचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.