स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.24) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 25 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील सुरज पत्राळी आणि सुखदेव ट्रेडर्स या दोन्ही दुकानाविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत बंगाली पांजा, इतवारी येथील बसंता डोमाजी बिनेकर यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत हरिहर मंदीर जवळ, भंडारा रोड येथील हरि एक्स्प्रेस यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पठाण ले-आऊट येथील गोयंका कन्स्ट्रक्श्न यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य्‍ पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत हम्पी यार्ड रोड, सिताबर्डी येथील प्लाटीना हॉस्पीटल यांच्याविरुध्द रस्त्यालगत जैव-वैद्यकीय कचरा सामान्य्‍ कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत सुंदरबन सोसायटी, श्रीनगर येथील कमल कुंज अर्पाटमेंट यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य्‍ पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार

Fri Nov 25 , 2022
मुंबई :- दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन 2021 व 2022 या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते. सन 2021 मध्ये अशोक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com