स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.17) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत धंतोली येथील धुर्वा रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत हरिहर मंदीर, लकडगंज येथील पियुष चौरिवार यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत धंतोली येथील धुर्वा रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द रस्त्यालगत बॅनर/होर्डिंग्जचे प्रदर्शन लावल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग न.29, हुडकेश्वर रोड येथील सागर सेलिब्रेशन्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत लॉनचा कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत अमिर किराणा स्टोअर्स जवळ, वांजरा येथील कुरेशि स्क्रॅप शॉप यांच्याविरुध्द भंगार दुकानाचा कचरा रस्त्यालगत फुटपाथवर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कटोल तहसील के 'डार्क जोन' गांवों का पुनरसर्वेक्षण कर (वस्तुनिष्ठ) रिपोर्ट दें : सभापती संजय डांगोरे

Fri Nov 18 , 2022
काटोल :- नागपुर जिले के काटोल तालुका में पिछले चार वर्षों की तुलना में इस वर्ष बेहतर वर्षा हुई है। इसके चलते काटोल तहसील के साथ नागपुर जिला जो गांव “डार्क जोन” में हैं उनके जल स्तर में बढोत्तरी हुई है. फलस्वरूप इसकी जांच करने से यह स्पष्ट हो सकता है कि “डार्क जोन” के लिये चिन्हित हैं. वे गांव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!