– 50 लोकांनी घेतला सहभाग
नागपुर :- विदर्भात पिढ्यानपिढ्या याच नावाने ओळखले जाणारे नागपुर विधानसभेसमोरील हे ऐतिहासिक मध्यवर्ती संग्रहालय. Central Museum of NAGPUR अशी सरकारदप्तरी जरी नोंद असली तरी ऑटोरिक्षावाल्याला पत्ता सांगायचे असेल तर अजब बंगलाच म्हणावे लागेल. इसवी सन १८६३ रोजी हे ऐतिहासिक मध्यवर्ती संग्रहालय तत्कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड( सी पी एन्ड बेरार) राज्यात स्थापन करण्यात आले. या संग्रहालयात मुख्यतः विदर्भ आणि मध्य भारतात उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तु ठेवण्यात आल्या आहेत. जैयनसोरचे फोसिल्स , पुरातन शिलालेख, मुर्त्या ,पौराणिक वस्तु, छायाचित्रे, जुन्या पांडुलिपी, हस्तलिखित ग्रंथ, वाकाटक, मौर्य, भोसले, गोंड, मुघल ,ब्रिटिश याकाळातील विविध प्रकारची आयुधे, वस्त्रं आणि वस्तू यांचा समावेश संग्रहालयात आहे. इतिहास संशोधकांसाठी सुसज्ज असे ग्रंथालय व अभिलेखागार हे अजब बंगल्याचे खास वैशिष्ट्य.
वेळप्रसंगी अजब बंगल्याचे असिस्टंट नेतुरकर यांनी प्राथमिक माहिती सांगितली आणि शिवशक्ती आखाड्याचे अध्यक्ष हितेश डफ ( शस्त्र अभ्यासक ) यांनी नागपूरकरांना शस्त्र ( ब्रिटिश कालीन शस्त्र, राजपूत कालीन शस्त्र आदिवासी शस्त्र मराठा कालीन शस्त्र )आणि शास्त्र याचे महत्त्व पटवून सांगितलं ” इतिहासाने विचार सुधारते विचाराने मस्तक सुधारते आणि सुधारलेला मस्तक कोणासोबत नतमस्तक होत नाही हा इतिहास आहे” सोबतच मूर्तिशास्त्रावर उत्कृष्ट असं मार्गदर्शन मूर्ती अभ्यासक पृथ्वीराज धवड यांनी केलं.
आपणही आपल्या नव्या पिढीला नागपूर विदर्भातील हा ऐतिहासिक वारसा दाखवायला घेऊन जाऊया अजब बंगल्यात..