स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.7) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत बजाजनगर येथील मिनल्स किचन कँटिन यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत इतवारी येथील ठाकरे क्लॉथ स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत दाभा येथील गॅलक्सी रेस्टॉरेन्ट ॲण्ड बार यांच्याविरुध्द हॉटेलचा कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत उमरेड रोड, विहिरगांव येथील यांच्याविरुध्द लॉनचा कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत वर्धमाननगर येथील Shreeji Chikki & Snacks यांच्याविरुध्द रेस्टॉरेन्टचा कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना, ‘या’ विषयावर बोलू नका!

Tue Nov 8 , 2022
मुंबईः हर हर महादेव चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयाला जातीय रंग देत असून सध्या आपण या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com