स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.2) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 19 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत नेताजी मार्केट, सिताबर्डी येथील वतन फ्लोवर शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी मार्केट येथील व्यास ट्रेडलिंक यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत पटेल चौक, घाट रोड येथील दिनेश मोटर्स यांच्याविरुध्द दुकानातील कचरा जवळच्या नाल्यात टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत प्रभाग नं.06, मोहम्मद रफी चौक, टेका येथील क्रीस्टल नर्सिंग होम यांच्याविरुध्द जैव-वैदयकीय कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिनेट पॅनल ची 4 नोव्हेंबर ला विद्यापीठांसमोर नारे निदर्शने 

Thu Nov 3 , 2022
नागपूर :- नागपूर विद्यापीठाद्वारे सिनेट निवडणूकीची घोषणा करण्यात आली. परंतु जुन्या पदवीधर मतदारांचे त्यात बी फार्म भरण्याच्या दृष्टिकोनातून काहीही वेळ न दिल्यामुळे, विद्यापीठ कायद्या विरोधी निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबरला दुपारी 11 ते 2 च्या दरम्यान विद्यापीठ प्रशासकीय भवना समोर (बजाज भवन) नारे व निदर्शने करण्यात येतील. हा निर्णय आज रविभवनात झालेल्या सिनेट परिवर्तन पॅनल मध्ये समाविष्ट असलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com