स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.31) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 16 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत नेहरु पुतळयाजवळ, इतवारी येथील कुकरे प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे नेहरुनगर झोन अंतर्गत खरबी चौक येथील गंगोत्री इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Tue Nov 1 , 2022
नागपूर :- स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. आणि नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  चिन्मय गोतमारे यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या तैलचित्राला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com