नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.20) ०७ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, नेहरूनगर,गांधीबाग आणि सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात ०६ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३०,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच १३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १५, रामदासपेठ येथील गणेश भोजनालय या उपहारगृह विरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.नेहरूनगर झोन अंतर्गत सक्करदरा चौक येथील गुरुकृपा स्वस्त कपडा भंडार या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच गांधीबाग झोन अंतर्गत महाल गांधीगेट येथील येथील रजा अगरबत्ती, खुशबू अगरबत्ती आणि के जी एन अगरबत्ती या दुकानांविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत इतवारी, नेहरू पुतळा येथील राहुल जनरल स्टोर्स या दुकाना विरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत वर्धा रोड स्थित राम स्वर मेडस्पेस सेंटर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.स्टिक विरुध्द मनपाची
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com