नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.27) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत मारवाडी चौक, इतवारी येथील अर्शद किराणा स्टोअर्स यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत बुटी चाळ,सिताबर्डी येथील गणगौर रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द सर्व्हिस रोड तोडणे आणि परवानगीशीवाय बेकायदेशीर लाईन चेंबरला जोडल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत एस.टी.बस.स्टॅण्ड जवळ, गणेशपेठ येथील M/s Shekhawat Logistics यांच्याविरुध्द लॉजिस्टीक कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच इमामवाडा येथील जादुगर प्रिंस यांच्याविरुध्द परवानगीशिवाय डिस्प्ले बॅनर / होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.