स्वच्छ भारत अभियान : कचरा जाळला, 5 हजार दंड

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.19) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील मोती महल रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत राणी दुर्गावती चौक येथील कदम किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत रामेश्वरी येथील मिस्टेक सोलुशन कोचिंग क्लासेस यांच्याविरुध्द रस्त्यालगत विद्युत खांबावर विना परवानगीने डिस्प्ले बॅनर / होर्डिग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत सक्करदरा येथील गर्व्हमेंट आयुर्वेदीक कॉलेज यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा जाळणे आणि प्रदूषण पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Raksha Mantri holds telephonic conversation with Canadian Minister of National Defence; Discusses ways to further develop bilateral defence relations for peace & security of Indo-Pacific

Thu Apr 20 , 2023
Raksha Mantri Rajnath Singh invites Canadian defence companies to invest in India & carry out co-production New Delhi :-Raksha Mantri Rajnath Singh held a telephonic conversation with Canadian Minister of National Defence Anita Anand on April 19, 2023. The conversation was warm and cordial. Both Ministers discussed ways to develop bilateral defence relations, which shall be reflective of their democratic […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com