स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.22) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत रेस्टॉरेंटचे टाकाऊ पदार्थ / जेवण जवळच्या मोकळया जागेत टाकले जात असल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत शिल्पा सोसायटी, मनीष नगर येथील श्याम सुंदर इस्टेट यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक विचार दिनी मनपाचे कार्यालय कचराविरहित करण्याचा संकल्प  

Thu Feb 23 , 2023
नागपूर : जागतिक विचार दिन अर्थात वर्ल्ड थिंकींग डे च्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये कचरा विरहित (झिरो वेस्ट) कार्यालयाचा संकल्प करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपा मुख्यालयासह सर्व झोन कार्यालयांमध्ये ‘झिरो वेस्ट’ कार्यालयाच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला.            मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com