स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर, ता. १२ : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.१२) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २० हजार रुपयांचा  दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत अंबाझरी रोड येथील राम सन्स ग्रुप यांच्याविरूध्द रस्त्यालगत बिल्डींग मटेरियल ठेवल्याबद्दल कारवाई करून १०  हजार रुपयांचा दंड वसूल केला.

          त्याचप्रमाणे गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत नंगा पुतला चौक येथील वानखेडे ट्रेडर्स आणि भालदारपूरा येथील ग्रील प्रिंटर्स यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विनाकारण उन्हात निघणे टाळा, आरोग्याची काळजी घ्या

Tue Apr 12 , 2022
– तापमान ४३ अंशावर पोहोचल्याने वाढला उष्माघाताचा धोका नागपूर, ता. १२ : नागपूर शहरातील तामपानात सातत्याने वाढ होत आहे. तापमान ४३ अंशावर पोहोचल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण उन्हात निघणे टाळावे, याशिवाय उष्माघात प्रतिबंधक नियमांचे पालन करून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.      नागपूर शहरातील तापमान ४३ अंशाच्या दरम्यान असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com