नागपूर :- स्थानिक कमला नेहरू महाविद्यालयाच्या 12 वी च्या विज्ञान, कला व वाणिज्य शाखेमध्ये विद्यार्थी प्राविण्य प्राप्त गुणवत्तेमध्ये उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 98.47% निकाल, वाणिज्य शाखेचा 85.52% कला शाखेचा 73.19% तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा 89.00% निकाल लागलेला आहे. विज्ञान शाखेत 03 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त असुन महाविद्यालयातुन प्रथम येणारा श्रीनंद प्रकाश पोहणे याने 94.00% गुण प्राप्त केले आहे. तर वाणिज्य शाखेत 14 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त असुन महाविद्यालयातुन प्रथम येणारी चैताली अनिल मुल्लेवार हिने 93.5% गुण प्राप्त केले आहे. तसेच कला शाखेत 02 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त असुन स्वीटी संजय केदार या विद्यार्थिनीने 84.17% गुण प्राप्त करून महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
बारावीची निकाल जाहीर झाल्यानंतर मेरीट विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला व उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार अॅड.अभिजीत वंजारी, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मीता वंजारी तसेच प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्यात.