नागपूर :- बुद्धगया येथे 12 फेब्रुवारी पासून देश विदेशातील बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास नागपुरातील भारतीय बौद्ध महासभा, दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती सह विविध संस्था संघटनांनी एक दिवशीय धरणा देऊन त्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
तथागत गौतम बुद्धांना अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी महाबोधी महाविहाराची निर्मिती केली. प्रशासकीय दृष्टीने ते महाबोधी महाविहार हल्ली ब्राह्मणांच्या कब्जात आहे.
महाबोधी महाविहार बौद्धांना सोपवावे यासाठी शंभर वर्षांपूर्वी अनागारीक धम्मपाल यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे त्या विहार समितीत चार बौद्ध भिक्खूंचा समावेश करण्यात आला. परंतु अजूनही तिथे ब्राह्मणांचे बहुमत आहे.
त्यामुळे बिहार सरकारचा 1949 चा बी टी अक्ट रद्द करून महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही भंते सुरेइ ससाई यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष आंदोलन चालले. हल्ली हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध भिक्खू चालवीत आहेत.
नागपुरातील संविधान चौकात महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ जनजागृती सभा घेण्यात येऊन बुद्धगया येथील बौद्ध भिक्खूंच्या त्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसेच नागपूरातून त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून अनेक भिक्षु व कार्यकर्ते सुद्धा सहभागी होणार आहेत. सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे त्या त्या धर्मांच्या ताब्यात असताना बौद्धांचे महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात का? असा प्रश्न जगातील बौद्ध विचारत आहेत!
याप्रसंगी प्रामुख्याने भंते महास्थवीर प्रियदर्शी, भंते महास्थवीर धम्मोदय, भंते विनयकीर्ती, भंते हर्षबोधि, इंजि पद्माकर गणगिर, इंजि राहुल दहिकर, उत्तम शेवडे, अशोक जांभुळकर, प्रा राहुल मून, रवी शेंडे, जयंत साठे, मुरली मेश्राम, भागवत लांडगे, धर्मपाल आवडे, आनंद चौरे, शामराव हाडके, सुमन लांडगे, ज्योती बनकर, रेखा मेश्राम, पपीता खोब्रागडे, रमा धोंगडे, रूपाली चांदेकर, पंचशीला सहारे, इंदू उमरे, मोनाली गेडाम, सविता वासनिक यांचे सहित मोठ्या संख्येने धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.