लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेलं राष्ट्रीयत्व : सुनील केदार

– दिनेश दमाहे, मुख्य संपादक

नागपुर – संपूर्ण भारतीय जनतेच्या हृदयातला स्वर म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज. लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेले राष्ट्रीयत्व. संपूर्ण देशाला एका सुराने एकवटण्याचा दैवी आवाज ईश्वराने त्यांना दिला होता. भारताची जागतिक पातळीवरची ओळख लतादीदी होत्या. आमच्या अनेक पिढ्या त्यांच्या सुमधुर गीतांनी मंतरलेल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस घरातील प्रत्येकाला शोकाकूल करणारा आहे. नागपुरात लतादीदी जेव्हा जेव्हा आल्यात, त्यावेळी त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. आमचं बालपण, आमचं तारुण्य,आमचं कार्यकर्तृत्व फुलवण्याचं काम या एका अजरामर आवाजाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील त्यांच्या ‘ए मेरे वतन के लोगो ‘, हे गाणं ऐकताना भावनिक झाले होते. त्यांचा सूर असा ह्दयाला हृदयाशी जोडणारा होता. आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत आणि मानवी समाजामध्ये ऐकण्याची कला जीवंत असेपर्यंत लतादीदींना कोणीही विसरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचे जाणे,संपूर्ण भारतीय समाजाला जागतिक स्वर -सुरांच्या विश्वासाला धक्का देणारे आहे. दीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सुरेल व अजरामर गीतांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या देशभक्तीला शतशः प्रणाम करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Sun Feb 6 , 2022
मुंबई दि. ६: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com