रविवारी महिलांच्या महामॅरेथॉन स्पर्धेसाठी मेट्रोत माता-भगिनींना मोफत प्रवासाची संधी

महामॅरेथॉनसाठी हजारो महिलांकडून उत्स्फूर्त नोंदणी

प्रशासनाकडून लाखोंची बक्षीसे जाहीर

पाच किलोमिटर विजेत्यासाठी स्कुटी

प्रत्येक गटात दहा बक्षिसांची घोषणा

प्रत्येक भागासाठी पार्किंगची व्यवस्था

चेस्टनंबर शाळांमधून व सेतू केंद्रातून घ्यावे

उदया शनिवारीही सेतू केंद्र उघडे असेल

नागपूर दि. ११ : महिलांसाठीच्या महामॅरेथॉन स्पर्धेसाठी केवळ एक दिवस बाकी असून रविवारी सकाळची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ‘ब्रेक द बायस, अर्थात भेदभाव सोडा या संदेशासाठी धावणाऱ्या महिलांना लक्षावधी रुपयांची बक्षिसे प्रशासनाने आज जाहीर केली आहे. कस्तुरचंद पार्कवर पोहोचणार या महिलांसाठी आपली मेट्रो सकाळी सहा ते नऊ या कालावधीत मोफत प्रवास करू देणार आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित महिला मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आता रविवार सकाळची वाट आहे. यामध्ये सर्व महिलांना सहभागी होता येणार आहे. आपल्या मुलीसोबत धावण्याची ही संधी आहेच. मात्र ज्या महिलांना स्वतंत्रपणे धावायचे आहेत त्यांच्यासाठी दोन किलोमीटरची फनरेस आयोजित करण्यात आली आहे. व्यवसायिक धावपटू एकीकडे पाच आणि तीन किलोमीटर स्पर्धेमध्ये धावत असताना महानगरातील महिला भगिनींनी दोन किलोमीटरच्या फन रेस मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

लाखो रुपयांची बक्षिसे
जिल्हा प्रशासनाने आज बक्षिसे जाहीर केली असून यामध्ये पाच किलोमीटर मध्ये प्रथम येणाऱ्याला इ स्कूटर दिली जाणार आहे. द्वितीय ४१ हजार, तृतीय ३१ हजार, त्यानंतर अनुक्रमे चौथा ते दहाव्या क्रमांकापर्यंत २१, १५, १०, ८, ६, ५, ४ हजाराची बक्षिसे आहेत. पाच किलोमीटर साठी इ-स्कूटरसह एकूण १ लक्ष ४१ हजाराची बक्षिसाची रक्कम आहे.
तीन किलोमीटरच्या गटासाठी सुद्धा पहिले बक्षीस 41 हजार रुपये आहे तर दुसऱ्या बक्षिसं पासून दहाव्या बक्षिक्षापर्यंत अनुक्रमे ३१, २१, १५, १०, ८, ६, ५, ४, २ हजाराची बक्षिसे आहेत. तीन किलोमीटर साठी एकूण बक्षिसांची रक्कम १लक्ष आहे.

दोन किलो मीटर फन रन साठी ज्या महिला भगिनी दोन किलोमीटर धावतील व कस्तुरचंद पार्कमध्ये उपस्थित असतील, त्यांच्यापैकी दहा जणांसाठी लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे दिली जाणार आहे. ही दहा बक्षिसे प्रत्येकी पाच हजाराची असणार आहेत.
महिला स्वयंसहाय्यता गटासाठी दहा बक्षिसे लकी ड्रॉ पद्धतीने ठेवण्यात आली आहे. ‘सेल्फ हेल्प ग्रुप ‘ साठी हे बक्षीस असणार आहे. ५ हजार रुपयांचे १० बक्षीस लकी ड्रॉ पध्दतीने दिले जाणार आहे. जवळपास पाच लक्ष रुपयांची बक्षिसे रविवारच्या महा मॅरेथॉन स्पर्धेत दिली जाणार आहे.

 

आपली मेट्रो कडून
मोफत प्रवासाची भेट
महाराष्ट्रात अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग होत आहे. यामध्ये प्रत्येकाच्या घरातील महिला भगिनी उदात्त हेतूने या स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे नागपूरकरांचे वैभव असणार्‍या आपली मेट्रोने देखील जिल्हा प्रशासनासोबत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या काळात प्रवास करणाऱ्या महिलांना मेट्रोकडून मोफत प्रवास मिळणार आहे. या स्पर्धेसाठी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. या काळातील प्रवासासाठी कोणतेच शुल्क मेट्रो आकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पार्किंग व्यवस्था
पार्किंग व्यवस्था पुढील प्रमाणे असणार आहे. सर्व व्हीआययपीसाठी पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे राहील. संविधान चौक ते झिरो माईल सेक्टर क्रमांक एक, झिरो माइल ते सविधान चौक सेक्टर क्रमांक 2 या भागात व्हीआयपी पार्किंग असेल.
वर्धा रोड अमरावती रोड हिंगणा रोड ग्रेट नाग रोड सीए रोड येथून येणाऱ्या वाहनचालकांनी मॉरीस कॉलेज परिसर सेक्टर क्रमांक ३ ( दुचाकी पार्किंग ) मॉरीस t-point मानस चौक सेक्टर 4 ( चारचाकी व दुचाकी पार्किंग ) पटवर्धन शाळा सेक्टर क्रमांक पाच ( स्कूल बस पार्किंग ) झिरो माइल ते ट्राफिक ऑफिस सेक्टर क्रमांक ६ ( चारचाकी दुचाकी पार्किंग ) प्रिन्स सावजी चे पाठीमागील बाजू ते फारेस्ट ऑफिस चौक सेक्टर क्रमांक सात ( दुचाकी पार्किंग ) मीठा नीम दर्गा ते कन्नमवार चौक सेक्टर 8 ( चारचाकी व दुचाकी पार्किंग ) गुप्ता हाऊस ते सायन्स कॉलेज चौक सेक्टर क्रमांक 9 ( चारचाकी दुचाकी पार्किंग ) सायन्स कॉलेज चौक ते आकाशवाणी चौक सेक्टर क्रमांक 10 ( चारचाकी व दुचाकी पार्किंग)
काटोल रोड, कामठी रोड, कोराडी रोड, गोधनी रोड, येथून येणाऱ्या वाहनचालकांनी पुढील ठिकाणी पार्किंग करावी.
लिबर्टी टॉकीज ते एलआयसी चौक दरम्यानची डावी बाजू ( चारचाकी व दुचाकी पार्किंग) एलआयसी चौक ते पाटणी ऑटोमोबाईल्स t-point दरम्यान डावी बाजू( चारचाकी व दुचाकी पार्किंग) लिबर्टी टॉकीज( चारचाकी व दुचाकी पार्किंग) स्मृती टॉकीज (चारचाकी व दुचाकी पार्किंग)

अशी होईल मॅरेथॉन
सर्व स्पर्धकांनी कस्तुरचंद पार्कमध्ये एकत्रित येणे आवश्यक आहे. सर्व प्रथम पाच किलोमीटरची स्पर्धा सुरू होईल. त्यानंतर तीन किलोमीटरची स्पर्धा चालू होईल. शेवटी दोन किलोमीटरची फन रेस होईल.
५ किमीसाठी ही मॅरेथॉन स्पर्धा कस्तुरचंद पार्क येथून सुरू होऊन संविधान चौक, विधानभवन रस्त्याने, जपानी गार्डन, वॉकर स्ट्रीट, रामगिरी, जिमखाना, व्हीसीए चौक, बीशप कॉलेज, बाटा शोरुम या मार्गाने मार्गस्थ होईल. स्पर्धेचा समारोप कस्तुरचंद पार्क येथेच चौकात होईल.
३ किलोमीटर स्पर्धा कस्तूरचंद पार्क, संविधान चौकातून सुरुवात आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, लेडीज क्लब, परत वळसा देऊन जीपीओ चौकातून संविधान चौक अशी सांगता होणार आहे.
2 किलोमीटरच्या फन रन स्पर्धेत सविधान चौक ते जीपीओ व परत संविधान चौक अशी स्पर्धा होणार आहे. या फन रनमध्ये सर्वांनीच सहभागी व्हावे, स्वत: जिल्हाधिकारी आर. विमलाही यामध्ये सहभागी होणार आहेत.

नोंदणी करण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने मॅराथॉन नोंदणीसाठी https://forms.gle/aj4DTYYMDhuoULwa6 ही लिंक जारी केली आहे. या लिंकवर गेल्यानंतर या स्पर्धेतील आपली नोंदणी होणार आहे. ज्यांनी नोंदणी केली त्यांनाच चेस्ट नंबर दिला जाणार आहे. चेस्ट नंबर साठी जिल्हाधिकारी कार्यालय पुढील सेतू केंद्र उद्या शनिवारी देखील खुले राहणार आहे. शाळांमधून नोंदणी झालेल्यांना शाळेतूनच चेस्ट क्रमांक दिला जाणार आहे. मात्र खाजगीरित्या नोंदणी केलेल्यांना चेस्ट नंबर उद्या सेतू केंद्रातून घ्यावा लागणार आहे. नागरिकांनी पहाटेचा हा सोहळा असल्याने येण्या जाण्याचा मार्ग समजून पार्किंगची व्यवस्था समजून कस्तुरचंद पार्ककडे पोहोचावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागपूरकरांसाठी हा अभिनव प्रयोग आहे, त्यामुळे यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी आर.विमला यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे यांचा आज नागपूर दौरा

Fri Mar 11 , 2022
नागपूर, दि. ११: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे या उद्या शनिवार, दि. १२ मार्च‌ रोजी नागपूर दौ-यावर येत आहेत. नीलमताई गो-हे यांचे सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजेपर्यंत राखीव. सकाळी सव्वाअकरा वाजता एनबीएसएस सभागृह, अमरावती रोड येथे आयोजित विदर्भ स्तरीय सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभाव्दारे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची यंत्रणा म्हणून वने व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com