संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी -मौदा विधानसभा युवक कांग्रेस च्या कामठी शहर अध्यक्षपदी सुमित धर्मदास शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्तीपत्र माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या शुभ हस्ते देऊन नवनियुक्त सुमित शेंडे चा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे पूर्व महासचिव नीरज लोणारे,मो इरशाद लोणारे, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे महासचिव अनुराग भोयर,कामठी मौदा विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष सलामत अली,नागपूर जिल्हा ग्रामीण युवक कांग्रेस उपाध्यक्ष राशीद अन्सारी ,कांग्रेस सेवादल कामठी तालुका अध्यक्ष किशोर धांडे, राजकुमार गेडाम,कांग्रेस सेवादल चे माजी कामठी तालुका अध्यक्ष प्रमोद खोब्रागडे,येरखेडा ग्रामपंचायत सदस्य इमरान नईम प्रामुख्याने उपस्थित होते.
या नियुक्तीबद्दल नवनियुक्त अध्यक्ष सुमित शेंडे यांनी युवक कांग्रेसच्या संघटनात्मक कार्य वृद्धिंगत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असुन पक्ष संघटना अधिक मजबूत व कणखर होत पक्षाचे ध्येय धोरण ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून पक्षाची विजय पताका शिखरावर पोहोचेल असा दृढ विश्वास व्यक्त करीत माजी जी प अध्यक्ष सुरेश भाऊ भोयर,कामठी मौदा विधानसभा युवक कांग्रेस चे नागपूर जिल्हा ग्रामीण युवक कांग्रेस अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे, कामठी मौदा विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष सलामत अली आदींचे मनःपूर्वक आभार मानले.