पोलीस स्टेशन सावनेर :- अंतर्गत पेठपुरा बाजार चौक सावनेर, दिनांक २७/५/२३ चे १९.०० वा ते २३.०० वा. दरम्यान,यातील मृतक प्रदीप गजानन ढवळे वय ४९ वर्षे रा पेठपुरा बाजार चौक सावनेर याचे लग्न झाले असुन त्याला काही मुले बाळे नव्हते मृतक हा दारू पिण्याचे सवईचा असुन त्याचे परीवारासोबत पटत नसल्याने अंदाजे ३ वर्षापुर्वी त्याचा व त्याचे पत्नीचा घटस्फोट झालेला होता. तेव्हा पासुन तो सावनेर येथे जुन्या घरी राहत होता, त्याला फिटची बिमारी असल्याने पैसे देण्याकरीता दि. २७/५/२३ रोजी सकाळी ०६.३० वा मृतकाच्या घरी फिर्यादी गेला असता, मृतक हा घरचा दरवाजा उघडत नव्हता, घराचे मागच्या बाजुने घरात प्रवेश करून मृतक हा वराचे स्लॅपचे लोखंडी कळीवर रेशमच्या दोरीने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत दिसून आला. त्यास खाली उतरवून उपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय सावनेर येथे आणले असता डॉ यांनी तपासून मृत घोषीत केले.
सदर प्रकरणी फिर्यादी संदीप गजानन ढवळे वय ४५ वर्षे रा वार्ड क २७, पेठपुरा बाजार चौक सावनेर यांचे रिपोर्टवरून पोस्टे सावनरे येथे कलम १७४ जाफौ चा मार्ग दाखल करण्यात आला. सदर मर्ग या तपास सफौ यादव हे करीत आहे.