संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी च्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (IIC) आणि इनक्युबेशन सेंटर द्वारे दि. ६ सप्टेंबर २०२४ ला स्मार्ट इंडिया हॅकेथॅान (SIH) २०२४ साठी परीक्षण स्पर्धा म्हणून एसकेबी इंटरनल हॅकॅथॉन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.
SIH पोर्टलवर उद्योग, सरकारी कार्यालये आणि प्रयोगशाळांनी पोस्ट केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थेच्या ११ संघांमध्ये ही स्पर्धा झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर हे अंतर्गत हॅकाथॉन समितीचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे परीक्षक होते. या नवकल्पना आणि अभिनव उपायांचे मूल्यांकन डॉ. विनिता काळे, डॉ. कृष्णा गुप्ता, डॉ. निशांत आवंडेकर आणि डॉ. रश्मी त्रिवेदी यांनी केले.
मुल्यांकन समितीने रुपांतरण क्षमतेला बळकटी देण्यासाठी तांत्रिक आणि नियामक बाबींची अंतर्दृष्टी दिली. अनेक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर नवकल्पना SIH २०२४ आणि आगामी फेऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी सक्षम आढळले.
या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनीष आगलावे, डॉ. शुभदा मंगरुळकर आणि डॉ. मयूर काळे होते. तांत्रिक सहकार्य अमन पलांदुरकर यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी ठाकरे यांनी केले.