संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 11:- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 15 चा विकासात्मक चेहरामोहरा निर्माण करण्यात माजी तरुण नगरसेवक नीरज लोणारे यांची यशस्वी भूमिका असून प्रभागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधेसह प्रभागातील नाली,रस्ते , पाणी, समाजभवन, आदी विकासकामे खेचून आणत प्रभागाचा विकास करून कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून नागरिकासमोर आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे मनोगत माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर प्रभाग क्र 15 येथे रस्ता व नाली बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनी मंजूर केलेल्या निधीतून व माजी नगरसेवक निरज लोणारे यांच्या अथक प्रयत्नाने आज 11 जून ला जुने प्रभाग क्र.15 रामगढ उडिया मोहल्ला येथील अत्त दीप बुद्ध विहार ते रवी कांबळे(सूत गिरणी) ते मनीष पानतावणे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट नाली व रिंकू कांबळे ते रवी कांबळे सिमेंट कॉकेट रस्ता चे भूमिपूजन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या शुभहस्ते करण्यात आले व नालीचे बांधकाम कार्य तात्काळ सुरू करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद नागपूर चे सदस्य दिनेश ढोले ,प्रभागांचे माजी नगरसेवक निरज लोणारे,माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान,,नटवर यादव,पुष्पदास नागदेवें,प्रशांत धनविजय,विक्की वाहने,लक्ष्मण दुर्गा,सुनील कांबळे,कमल,रिंकू कांबळे,कोमल लेंडारे,मंगेश खांडेकर,विशाल मेश्राम,संदीप सुखदेवे ,आदी उपस्थित होते.