संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी
– कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर 15 व 16 नोव्हेंबर रोजी ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चे आयोजन
कामठी :- कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 25 वा वर्धापन दीन असून या वर्धापन दिन तसेच रोप्य महोत्सव निमित्त 15 व 16 नोव्हेंबर ला दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात सुशोभीतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या पेंटिंगचे काम कुशल कामगारांच्या हस्ते अहोरात्र सुरू आहे.ड्रॅगन पॅलेस येथील मार्बल फिटिंगचे तसेच नुतानीकरनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.10 एकर जागेवर असलेल्या परिसरातील लॉन, फुलझाडे व सुशोभित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.शेकडो कामगार ड्रॅगन पॅलेस परिसरात कार्यरत असून ड्रॅगन पॅलेस ला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कामे सुरू असून त्या व्यक्तीशा प्रत्येक कामाकडे लक्ष घालीत आहेत.दोन दिवसीय आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल मध्ये 15 व 16 नोव्हेंबर ला विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील सहा फूट उंच असणारी व 864 किलोग्राम वजनाची चंदनाची तथागत गौतम बुद्धांची मूर्ती ही अप्रतिम बुद्धमूर्ती अखंड चंदनाच्या लाकडापासून बनविण्यात आली असून 6 फूट उंच व 864 किलो वजनाची आहे.या मूर्तीचे सुंदर डोळे अर्धान्मीलित आहेत.
उल्लेखनीय आहे ,कामठी येथील कर्मवीर दादासाहेब कुंभारे परिसराच्या 10 एकर जागेवर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची निर्मिती कार्तिक पोर्णिमेच्या पावन पर्वावर सन 1999 मध्ये साकारण्यात आले असून या विहाराच्या निर्मितीसाठी अत्यंत उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले आहे.शेकडो कुशल कामगारांच्या अथक प्रयत्नातून ही वास्तू साकारली आहे राजस्थान येथील संगमरवर,आग्रा येथील लाल दगड,दक्षिण भारतातून कुशल तंत्रज्ञानाकडून तयार केलेले ग्रॅनाईटचे कठडे आपले वेगवेगळे वैशिष्ट्य दर्शवितात.
प्लास्टर न करता वापरण्यात आलेले कांक्रीट येथील उच्च दर्जाच्या बांधकामाची साक्ष देत.पर्यावरणाच्या आवश्यकतेनुसार छताला लक्ष वेधून घेणाऱ्या निळ्या रंगाच्या इटालियन काचा वापरण्यात आले आहेत.विहारातील मंच अत्यंत शुभ्र सगमरवरापासून साकारण्यात आला आहे.तंत्रशुद्ध ध्वनोक्षेपण व्यवस्था व प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
या परिसरात नयनरम्य बगीचा हिरवळीचे गलीचे व रंगीबेरंगी कारंजे या ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची शोभा द्विगुणित करतात.गेल्या 25 वर्षात विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लाखोंच्या संख्येने देश विदेशातील लोकांनी भेट देऊन ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे विश्वशांतिचे केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या 25 वर्धापन दिन तसेच रौप्य महोत्सव निमित्त 15 व 16 नोव्हेंबर ला दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येत नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखा कुंभारे यांनी केले आहे.