गडचिरोली – दि. २०/०२/२०२२ रोजी उप पोस्टे झिंगाणुर येथे पोलीस अधिक्षक गडचिरोली अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंढे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख साहेब, अपर पोलीस अधीक्षक(अहेरी) अनुज तारे साहेब यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वीर बाबुराव शेडमाके कबड्डी भव्य स्पर्धेचे आयोजन केले.
सदर स्पर्धेमध्ये पोस्टे हद्दीतील एकूण १० कबड्डी संघानी सहभाग नोंदवला.
सदर क्रीडा स्पर्धेत अध्यक्ष म्हणून उपपोस्टे झिंगाणुर चे प्रभारी अधिकारी पोउपनि देविदास झुंगे,प्रमुख पाहुणे म्हणून पोउपनि राहुल घुले तसेच उद्घघाटक म्हणून सिरिया जी मडावी तसेच शंकर मडावी, मोहन कुळमेथे, रामचंद्र कुमरी (लोकमत वार्ताहर), दासु मडावी, भारत मडावी, मारा आत्राम, कैलास आत्राम, वंजा मडावी, ईत्यादी पोस्टे हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक झिंगाणुर चे आरोग्य पथक उपस्थित होते. सदर स्पर्धेचे उदघाटन श्री सिरियाजी मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थीत संघांना पोलीस दलाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कबड्डी स्पर्धेचे पहिला टप्पा,दुसरा टप्पा व तिसरा टप्पा बाबत सविस्तर माहिती देन्यात आली.सदर सामने अत्यंत उत्स्फूर्तपणे आनंदी वातावरणात पार पडले. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक वडदेली अ संघांला 3000 रोख रक्कम , द्वितीय झिंगाणुर चेक नं.१ संघाला 2000 रोख रक्कम,तृतीय झिंगाणुर चे.नं.2 संघाला 1000 रोख रक्कम असे बक्षिसे प्रशस्ती पत्र व महिला संघाना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत पंच म्हणून मंडल मेजर,जाधव मेजर यांनी भूमिका पार पाडले तर खेडाळु निवड समीती म्हणून पोउपनि राहुल घुले शंकर मडावी, मारा आत्राम यांनी काम बघीतले.
बक्षीस वाटप कार्यक्रमात उपस्थित खेळाडू व नागरिक यांना गडचिरोली पोलीस अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना,विविध कागदपत्रे, तसेच विविध प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती पोउपनि देविदास झुंगे प्रभारी अधिकारी उपपोस्टे झिंगाणुर यांनी दिली. तसेच सदर योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर स्पर्धेतील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, प्रेक्षक यांचे जेवनाची सोय करण्यात आली. सदर कबड्डी स्पर्धेकरिता झिंगाणुर हद्दीतील खेडाळु व नागरिक १५० ते २०० उपस्थित होते. सदर कबड्डी स्पर्धा यशस्वी होनेकरिता जिल्हा पोलीस,SRPF, अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.