संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज २६ नोव्हेंबर सकाळी ९:०० वाजता नवयुवक उच्च प्राथमिक शाळा, गौतम नगर , कामठी येथील विद्यार्थ्यांनी कुंभारे कॉलनी परिसरात संविधान रॅली काढून संविधान दिनाच्या निमित्ताने बोधी वाचनालय परिसर येथे पथनाट्य सादर करण्यांत आले व परिसरात संविधान दिनानिमीत्य जनजागृती करण्यांत आली. तसेच नवयुवक उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात सकाळी ११.००वाजता संविधान प्रस्ताविका चे सामूहिक वाचन करून पथनाटय सादर करण्यांत आले याप्रसंगी इयत्ता पहिली चा विद्यार्थी रिहांश घरडे यानी डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांची भूमिका वटवून शिका ,संघटीत व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला . त्याच्या भूमिकेचे सर्वानी कौतुक केले .
मुख्याध्यापक विजय नंदनवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. मनिष मुडे ,गौतम माटे ,छाया तांबे , अरुणा रायबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार शेन्डे आभार प्रदर्शन जीवन झिंगरे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मयुरी यादव , पूजा इंगोले , दिपाली आठवले, नाजुका मानवटकर ,विभा सोनडवले , प्रांजली वाटकर , कविता डोनेकर , स्वाती ठाकरे आदिंनी परिश्रम घेतले .