यवतमाळ :- स्टुडंट्स ईस्लामीक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी ही संघटना बेकायदेशीर संघटना असल्याचे केंद्र शासनाने अधिसूनचा काढून घोषित केले आहे.
केंद्र शासनाच्या गृह विभागाने दि.29 जानेवारी 2024 रोजी याबाबात अधिसूचना काढली आहे. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 कायद्याच्या कलम 3 च्या उपकलम (1) द्वारे स्टुडंट्स ईस्लामीक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी ही संघटना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 च्या कलम 42 द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकारने दि.5 फेब्रुवारी 2024 च्या अधिसूचनेद्वारे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश देखील या कायद्याच्या कलम 7 आणि 8 अंतर्गत केंद्र सरकारद्वारे वापरता येणारे अधिकार वापरतील असे निर्देश दिले असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.