संदीप कांबळे,कामठी
सकाळी व सायंकाळी स्टार बस च्या फे-या वाढविण्या याव्या.
कन्हान : – बर्डी नागपुर ते टेकाडी फाटा पर्यंत स्टार बस सेवा सुरू असुन आंबेडकर चौक कन्हान येथे स्टार बस थांबत नसल्याने या परिसरातील प्रवाशी नागरिकांना त्रास करावा लागत असल्याने स्टार बस चा आंबेडकर चौक येथे थांबा देण्यात यावा तसेच सकाळी व सायंकाळी स्टार बस च्या फे-या वाढविण्या याव्या. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बर्डी नागपुर ते टेकाडी फाटा पर्यंत स्टार बस सेवा सुरू असुन नगरपरिषद कन्हान, तारसा रोड चौक व धर्मराज शाळे समोर स्टार बस थांबा देण्यात आला आहे. परंतु कन्हान शहराच्या मध्य भागी असलेल्या आंबेडकर चौक कन्हान च्या अलीकडे विवेकानंद नगर, अशोकनगर, शिवाजी नगर, धरमनगर, पिपरी, गाडेघाट, जुनिकामठी आणि पलीकडे गणेश नगर, जवाहर नगर, हनुमान नगर, गुरफुडे ले-आऊट, राम नगर, लोहिया ले-आऊट, तुकाराम नगर, राधाकृष्ण नगर अशी दाट लोक वस्ती असुन पिपरी, जुनिकामठी रोड व पांधन रोड ने येणा-या जाणा-यांची आंबेडकर चौकातुन चांगलीच वर्दळ आहे. या परिसरातील विद्यार्थी, नौकरी, कामकरी नागरिकांना स्टार बस ने जाणे येणे करण्याकरिता नगरपरिषद कन्हान सामोर किवा तारसा रोड चौकातुन बस पकडावी लागत असुन हे अंतर जास्त असल्याने बस सुटुन दुस-या येणा-या बस करिता थांबावे लागत असल्याने नागपुर शहरात कर्तव्यावर जाण्यास उशीर होतो. नागपुर वरून येणा-या म्हाता-या च्या म्हणण्या वरून कधी कधी चालक या चौकात थांबवितात तर कधी कधी हळु करित असल्याने काही प्रवाशी उतरताना पडत असतात. अश्या अनेक प्रकाराच्या त्रासा पासुन मुक्त करण्याकरिता स्टार बस चा आंबेडकर चौकात थांबा देऊन प्रवाशाचे समाधान करण्यात यावे. तसेच स्टार बस सकाळ व सायंकाळी गच्च भरून जात असल्याने या वेळेवर बस फे-या सुध्दा वाढविण्यात याव्या ही मागणी नागरिकां कडुन जोर धरू लागली आहे.