शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक…

मुंबई :- शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही,पिकावाचून मरतोय शेतकरी ,सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे… शिंदेसरकारने केलं काय, जाहिरातीशिवाय दुसरं काय… पिकाला नाही पाणी, मालाला नाही भाव, अरे सरकारा कधीतरी बळीराजाला पाव… महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत आजही शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाच्या मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले.

चोर मचाये शोर अशा आशयाचे बॅनर फडकवून वीज प्रश्नावर आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणार्‍या आमदार प्रसाद लाड, राम सातपुते, प्रवीण दरेकर यांचा निषेध करण्यात आला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारला सळो की पळो करून सोडले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून आठ महिन्यांत 4800 रुग्णांना 38 कोटी 60 लाखांची मदत

Wed Mar 1 , 2023
मुंबई :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आठ महिन्यांत 4 हजार 800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे. जुलै 2022 मध्ये महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com