संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 10:- बालक हे कुंभाराच्या कच्च्या मडक्यासारखे असतात.बालवयात त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांच्या उभ्या आयुष्यभर सोबत घेऊन स्वतासह समाजाची सेवा करतात .त्यांच्यावर बालवयात झालेले संस्कार त्यांच्यातल्या बुद्धीला चालना मिळून उद्याचे भविष्य घडविण्याकरिता बाल संस्कार शिबिर,उन्हाळी शिबिर अनमोल ठरतात असे मौलिक प्रतिपादन 15 दिवसीय स्वच्छंद समर कॅम्प च्या उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक शिवभक्त आकाश भोकरे यांनी व्यक्त केले.
सायली हॉस्पिटल , बॉक्सिंग ट्रेनिंग सेंटर कामठी येथे आज 10 मे पासून 15 दिवसीय स्वच्छंद समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले . या कॅम्प मध्ये 70 मुले, मुलींच्या समावेश झालेला असून या कॅम्प मध्ये योगा, सूर्यनमस्कार , आत्मरक्षण टेकनिक, बॉक्सिंग , परसनलिटी डेवलपमेंट व इतर मैदानी खेळाचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ सुमित पैडलवार, आणि शिवभक्त आकाश भोकरे मार्फत करण्यात आले . याप्रसंगी शिवभक्त पंकज नालेंद्रवार सह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन निशा चौधरी, महल्ले मैडंम, खुरगे मॅडम यांच्या वतीने करण्यात आलेले आहे .