संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दोन आरोपी अटक, १२ चाकी ट्रक सह २४ लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.
– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीसां ची अवैद्य वाहतुकीवर मोठी कारवाई.
कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीस अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करित असतांना गुप्त माहितीवरून कन्हान पोस्टे अंतर्गत नागपुर जबलपुर बायपास रोडवर कुंभ लकर धाब्या समोर कत्तलीकरिता अवैधरित्या जनाव रांची वाहतुक करणारा १२ चाकी ट्रक पकडुन २४ लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्या तील ३१ जनावरांना गौरक्षण देवलापार ला सुरक्षित दाखल करून जिवनदान देत दोन आरोपी विरूध्द कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून मोठी कारवाई करण्यात आल्याने स्थागुशा ना.ग्रा पोलीसांचे कन्हान परिसरातुन कौतुक करण्यात येत आहे.
सोमवार (दि.०३) मार्च २०२५ ला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक अवैध धंदयावर कार वाई करणेकामी पेट्रोलींग करित असतांना पोलीसांना गुप्त खात्रीशीर माहीती मिळाली की, जबलपुर रोड कडुन नागपुर कडे १२ चाकी ट्रक क्र. एमएच ३४ एबी. ६६२९ मधुन काही इसम कत्तलीकरिता अवैधरित्या जनावरांची वाहतुक करत आहे. अश्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत नागपुर जबलपुर बायपास रोडवरील कुंभलकर धाब्या समोरील रोडवर नाकाबंदी केली असता संशयित १२ चाकी ट्रक येताना दिसला. त्यास थांबवुन वाहनाची पाहणी केली तर त्यामध्ये ३९ काळे, पांढरे, लाल रंगा चे लहान मोठे गोवंश जनावरे दिसुन आले. त्यापैकी ८ जनावरे मयत झालेली दिसली.
जनावरांना निर्दयते कोंबुन आखुड दोरीने बांधुन, त्यांची सुरक्षेची काळजी न घेता तसेच चारापाणीची व्यवस्था न करता वाहतुक करित असल्याचे वाहन चालक ईस्तेखार खान गुलाब खान आणि त्याचा साथीदार शेख जावेद शेख जफर हे दोघे मिळुन आले. आरोपीतांना परवान्या बाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवा ना नसल्याने पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीच्या ताब्या तुन एक १२ चाकी ट्रक क्र एम एच ३४ ए.बी.६६२९ किंमत २०,००,००० रूपये आणि ३१ गोवंश जनावरे ४,६५,००० रूपये एकुण किंमत २४,६५,००० रूपया चा मुद्देमाल जप्त केला. ३१ गोवंश जनावरांना गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे सुरक्षितरित्या दाखल करून कन्हान पोस्टे ला आरोपी चालक ईस्ते खार खान गुलाब खान, वय ३२ वर्षे रा. रिवा ता. जि. रिवा, मध्यप्रदेश आणि त्याचा साथीदार आरोपी शेख जावेद शेख जफर वय २८ वर्षे रा. ताजबाग सिंधीवन उमरेड रोड, नागपुर यांच्या विरूध्द कलम ११(१)(क) (ड)(च)(ज)(ट)(झ) प्रा.छ. अधि. सह कलम ५ (१) अ ५(२) ब ९ महा. प्राणी सुरक्षा अधिनियम सह कलम ३२५, ३(५) भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात सपोनि किशोर शेळकी, पीएसआय विनोद काळे, पोहवा. किशोर वानखेडे, प्रमोद भोयर, नापोशि संजय बरोदिया, पोशि आशुतोष लांजेवार आदीने शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.