मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर सुपर टाऊन कन्हान कन्हान येथे अवैधरित्या तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकुळ घालत फिरणारा आरो पी जिगर कनोजिया यास स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवा र जप्त करून पोस्टे कन्हान ला त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीस कन्हान पोली साच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२१) डिसेंबर ला सायंकाळी ७ ते ७.४५ वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण चे सपोनिअनिल राऊत आपल्या सहकर्मी पथकासह शासकिय वाहन क्र. एम एच-३१ डी झेड – ०४६४ ने कन्हान उप विभागात पेट्रो लिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि, प्रगती नगर सुपर टॉऊन कन्हान येथे एक इसम तलवार घेऊन सार्वजनिक स्थळी धुमाकुळ करि त आहे. विश्वसनीय खबरे वरून पंच व स्टाफसह पोह चलो असता मिळालेल्या बातमी प्रमाणे राम जामकर यांच्या घरा शेजारी असलेल्या खुल्या जागेत एक इसम हातात तल वार घेवुन दिसला. त्यास पकडुन त्याचे नाव , पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव जिगर राजेश कनोजिया वय २३ वर्ष राह. प्रगती नगर सुपर टाऊन कन्हान असे सांगीतल्याने त्यास पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्याच्या जवळ असलेली एक पांढ-या धातुची तलवार किंमत एक हजार रूपयाची जप्त करून पोस्टे कन्हान ला सरकार तर्फे फिर्यादी पोहवा गुरूप्रसाद मेश्राम च्या तक्रारीने आरोपी जिगर राजेश कनोजीया वय २३ वर्ष राह. प्रगती नगर सुपर टाऊन यांचे विरुद्ध अप क्र ४८०/२२ कलम ४,२५ भा.ह.का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीस कन्हान पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण चे पो.नि. ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्ग दर्शनात सपोनि. अनिल राऊत, पो.हवा. विनोद काळे, नाना राऊत, पोना प्रणय बनाफार, वीरेंद्र नरड, चालक पो हवा. ज्ञानेश्वर पाटील आदीने यशस्विरित्या पार पाडली.