रामटेक – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य समन्वय समिती महाराष्ट्र यांनी 23 व 24 फेब्रुवारी 2022 ला संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारी-निमसरकारी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरीता दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे.
कर्मचारी व शिक्षकांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून या मागण्यांविषयी राज्य सरकार कमालीचे उदासीन आहे. आजमितीस शासन धोरण खासगीकरणाच्या दिशेने जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वेतन कपात, नोकर कपात, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त कार्यभार, कल्याणकारी योजना बंद करत कंत्राटीकरण व आउटसोर्सिंगला अधिक प्राधान्य देत आहे,याचा विरोध करणे आवश्यक आहे.
संघटनेच्या हाकेवर राज्यभरातील 17 लाख अधिकारी- कर्मचारी व शिक्षक आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संपावर आहेत. या संदर्भात 28 मागण्यांची नोटीस दिनांक 1 फेब्रुवारी 2022 ला मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास देण्यात आली होती.
अन्यायकारक एनपीएस योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा, अंशकालीन व कंत्राटी रोजंदार कर्मचाऱ्यांच्या तथा अंगणवाडी, आशा वर्कर यांच्या सेवा नियमित करा, शासकीय विभागाचे खाजगीकरण बंद करा,सर्व विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिनशर्त करा, बक्षी समिती अहवाल खंड-2 प्रसिद्ध करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची रोखलेले पदोन्नती लागू करा, कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा मंजूर करा, आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम करणार्या कर्मचार्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्या, केंद्राच्या धर्तीवर 10,20,30 वर्षांची कालबद्ध पदोन्नती लागू करा, गट ड ची पदे व्यपगत करू नका, आरोग्य विभागातील भरती नियमित करा यांसह विविध मागण्यांकरिता संप करण्यात आला.
यावेळी रामटेक येथे तहसील कार्यालय ,पंचायत समिती कार्यालय येथील अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपात उपस्थित होते. संपात गजानन टापरे, विकास गणविर, राजेश जगणे, नारायण कुंभलकर, मुकुंदा मरसकोल्हे, आतिष जाधव, राजू तडस, मोरेश्वर टेकाम, निकिता पुंडे, छाया बुद्धे, अलका बनसोड, लीलाधर पापडकर, नागार्जुन खैरे, शुभांगी उके, वेणुगोपाल येलुरे,आशा चव्हाण, शंकर गंभीरराव, उमाकांत लाबडे, धीरज बागडे, चंद्रकांत चकोले, नरेंद्र इनवाते, हेमराज बनकर, प्रमोद वराळे, विजय साबळे, गजानन शेंडे, विनोद वाघमारे, मोदीलाल मेश्राम, गजानन वीर, सिद्धार्थ शहारे,विनोद चुटेलकर,लक्ष्मण वासनिक,अनिल उंदीरवाडे,भोजराज कोरे,सादोराव गजाम,उल्हास नगराळे,
आसाराम इरपाते,लीलाधर सोनावणे, शिक्षक, ग्रामसेवक,लिपिक,महसूल,कृषी,पा णीपुरवठा, बांधकाम, पंचायत,सिंचन विभाग संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.