राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 21.88 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई :- उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अंजूरगाव खाडी, कालवारगाव, छोटी देसाई मोठी देसाई खाडी, अलिमघर, दिवा खाडी, माणेरेगाव या ठिकाणी हातभट्टी केंद्रावर छापे टाकले. या मोहिमेतील कारवाईमध्ये 12 गुन्हे नोंदविले असून यामध्ये एकूण 21 लाख 88 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये 55 हजार 200 लिटर रसायन, 35 लिटर गावठी दारू, दोन डिझेल इंजिन व इतर हातभट्टी साहित्याचा समावेश आहे. नाशवंत मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आला ,तर दोन डिझेल इंजिन जप्त करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, ठाणे व डोंबिवली विभागातील निरिक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली आहे, असे कोकण उपायुक्त पवार यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

Fri Jun 7 , 2024
मुंबई :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मुंबई शहर व उपनगर साठी विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाच्या सामाजिक,आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत,असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!