श्री क्षेत्र नाग द्वार (पचमढी)करीता काटोल आगारातून आगाऊ तिकीट विक्री केंद्र सुरू करा- अनिल नेहारे

काटोल :- नागपूर वरून नाग द्वार या‌ धार्मीक स्थळासाठी नागपूर वरून गणेशपेठ बसस्थानक येथे भाविकांसाठी पूर्वीच आरक्षण करून घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. अश्याच प्रकारे अशीच आगाऊ तिकीट काढण्यासाठी काटोल आगारातूही श्रीक्षेत्र नाग द्वार करीता आगाऊ तिकीट काढण्यासाठी तिकीट कांऊटर सूरु करण्याची मागणी चे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काटोल तालुका अध्यक्ष व मेटपांजरा ग्रा प सरपंच अनिल नेहारे यांनी केली आहे.

महाशिवरात्रीच्या पर्वावर मध्यप्रदेशातील पचमढी जवळच्या मोठा महादेव गडावर भव्य यात्रा भरते. नागपूरसह विदर्भातील भाविक लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर (Nagpur) येथून विशेष बसफेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. 01 ते 19 आगस्ट दरम्यान गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानक येथून दुपारपासून दर अर्धा तासाने बसफेऱ्या सोडण्यात येतील. पचमढी येथून परतण्यासाठीही बस फेऱ्या सोडण्यात येणार आहे. या व्यवस्थेमुळे पचमढीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाग द्वार या श्रीक्षेत्र मिनिअमरनाथ म्हणून प्रसिद्ध नाग द्वार (पचमढी) करीता काटोल /कोंढाळी/नरखेड येथील वाहतूक नियंत्रक केंद्रातून आगाऊ तिकीट विक्री सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढले व ग्रामीण भागातील भाविकांना सोयीचे होईल असे म न से तालुका अध्यक्ष अनिल नेहारे यांनी काटोल चे आगार व्यवस्थापक अनंत तातर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी दिलीप हिरूटकर, ईश्वर गायकवाड, नितीन तायवाडे, भूषण सुर्यवंशी, राहूल वाहणे, पवन कोरडे, अनिल शेंडे, आरती गीरी नाग द्वार मंडळ,,, पंचमुखी नागेश्वर नाग द्वार मंडळ,,, तसेच नाग द्वार स्वामी सेवा मंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते.

*गणेशपेठ बसस्थानक येथे आरक्षण व्यवस्था*

गणेशपेठ बसस्थानक येथे जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी पूर्वीच आरक्षण करून घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक, बसस्थानक प्रमुखांसोबत संपर्क साधता येईल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेऊन सुरक्षित व आरामदायी प्रवास करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक निलेश धारगावे यांनी केले आहे.

*नागपूर ते पचमढी बस सुटण्याच्या वेळा*

दुपारी 4, 4.30, 5, 5.30, 6, 6.15, 6.30, 7, 7.15, 7.30, 8, 8.15, 8.30, 9, 9.30, 9.45, 10, 10.30, 11.

*पचमढी ते नागपूर बस सुटण्याच्या वेळा*

दुपारी 3, 3.15, 3.30, 4, 4.30, 5, 5.30, 6, 6.30, 7, 7.30, 7.45, 8, 8.30, 9, 9.15, 9.30, 10, 10.30.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन

Fri Jul 26 , 2024
– नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा – विभागीय महसूलआयुक्त पी.वेलरासू  नवीमुंबई :- महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट हा “महसूल दिन” साजरा करण्याबरोबरच 1 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या सात दिवसात कोकणातील प्रत्येक जिल्हयात शासनाने दिलेल्या सुचनांबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांनी केले आहेत. या सप्ताहात महसूल विभागाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com