एसटी बस कंडक्टर ने नाबालिग मुलींची केली छेडछाड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- महामंडळ एसटी बस कंडक्टर ने नाबालिक मुलींची छेडछाड करून बस कांद्रीत न थाबता तारसा रोड चौकात थाबवल्यावर त्या मुलीच्या आत्यानी जाब विचारला असता त्यांचा सुध्दा विडिओ काढुन त्या बस मध्ये चढल्या असता त्यांचा हात ओढल्याने सदर प्रकरणी कन्हान पोलीसानी घटस्थळी पोहचुन बस व कंडक्टर ला ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील कारवा़ई करण्यात येत आहे.

रविवार (दि.९) जुन ला सकाळी ११ वाजता दरम्यान आमदार महोत्सवाचा आनंद घ्यायला कांद्री च्या चार मुली रामटेक येथे गेल्या होत्या. सोमवार (दि.१० ) जुन ला चार ही मुली सकाळी १० वाजता दरम्यान रामटेक बसस्थानाकावरुन कन्हान ला येण्यास निघाल्या यावेळी तक्रारदार महिलाच्या भाचीने फोन करुन सांगितले कि आक्का आमच्या सोबत बस कंडक्टर चुकीची हरकत केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची बस क्रमांक एम एच ७ सी ९४७३ या बस कंडक्टरने मुलीला बस मधुन ढकलुन दिले व चौघींना बसवुन दार लाऊन दिले आणि खिडकी उघडी असल्याने महिलेच्या भाचीने आवाज दिल्याने कंडक्टर ने म्हटले कि तु समोर भेट तुला पाहतो. त्यानंतर महिलेने फोन कट करुन मुलींना फोन केला तेव्हा मुलींनी सांगितले कि, माझा व माझा मैत्रिणीचा हात ओडुन सिटवर बसवले आणि म्हटले कि मी कांद्रीत बस थांबवणार नाही. सरळ कन्हान ला थांबवणार. सदर घटनेमुळे मुली घाबरल्या असल्याने महिलेनी त्यांना म्हटले कि तुम्ही घाबरु नका मी कांद्रीत बस थांबवतो. परंतु बस चालकाने कांद्री बस स्टॉपवर बस न थांबवता कन्हान तारसा चौकात थांबवली. महिलेने कंडक्टर ला म्हटले कि मुलींसोबत हलकट सारखा का वागला, तेव्हा कंडक्टर खिडकी मधुन महिलेचा व्हिडियो बनवत असतांना महिलेने बस मध्ये चढुन हटकले असता त्याने महिलेचा हात आपल्याकडे ओढला. सदर घटने बाबत ११२ नंबर वर संर्पक केला आसता फोन लाग. ला नाही, कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना फोन केला असता उचलला नाही. काही वेळाने पोलीस निरीक्षक उमेश पाटील आपल्या स्टाफ सह घटना स्थळी पोहचले आणि बस कंडक्टर ला ताब्यात घेऊन बस पोलीस स्टेशनला लावली. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी महिलेचा तक्रारीवरून बस कंडक्टर विरुद्ध अप क्र. ४००/२४ कलम ३५४, १२ अन्वये गुन्हा दाख ल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

Wed Jun 12 , 2024
– राम नाईक, राजदत्त, उदय देशपांडे, कुदंन व्यास सन्मानित – बाल पुरस्कार विजेता आदित्य विजय ब्राह्मणे मरणोपरांत सन्मानित मुंबई :- यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा मंगळवारी (दि.११) राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com