हिंगणा :- डिंगडोह नगर परिषद अंतर्गत पोलीस नगरात संगीतमय श्रीमद भागवत सप्ताहाला नुकतीच सुरुवात झाली आहे. भव्य कलश यात्रा व ग्रंथ पूजनाने ह.भ.प. श्री किशोरजी महाराज ठाकरे (खानापूर, अमरावती) यांनी सुरू केलेल्या ज्ञानयज्ञात शेकडो स्त्री पुरुष भाविक जवळपासच्या परिसरातून खास भागवत श्रवण करण्यासाठी गर्दी करत आहेत.
भागवत ग्रंथ व महाभारतातील सुरस कथा सोबतच त्या प्रसंगाला अनुरूप नाट्य बघुन परिसर भागवत भक्ती रसात न्हाऊन निघाला आहे.दररोज भजन ,भारुड व विविध धार्मिक कार्यक्रम व आरती ला भाविकांची गर्दी असते. संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजनाकरिता रवींद्र कोकाटे, विष्णुपंत बानाईत, हुमेश तिडके, अरुण गंधरे, हरिदास भाववत, विलास काटोळे, मधुकर शिंदे, आनंद फरकुंडे, किशोर मोरे, ऍड.जीवन शुक्ला, राजाराम पांडे, रमेश नंदवीकर, बी पी सिंह ,संजय कडू परिश्रम घेत आहेत.