नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणा-या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन उद्या गुरुवार १४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे नागपूर महानगर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके उपस्थित राहतील.
नागपूर शहरासह विदर्भातील खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणा-या खासदार क्रीडा महोत्सवाला लवकरच सुरूवात होणार आहे. खेळाडूंना नोंदणी तसेच अन्य महत्वाची माहिती मिळविण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाची मोठी मदत होते. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शहरातील खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.