खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून क्रीडा संकुलांची कामे करावी – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

– प्रस्तावित विभागीय, जिल्हा, तालुका क्रीडा संकुलास प्रशासकीय मान्यता

– राज्य क्रीडा विकास समितीची बैठक

मुंबई :- ‘राज्य शासनाच्या निधीतून क्रीडा संकुलासह क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देताना खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून क्रीडा संकुलांची कामे करावी, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक संपन्न झाली, याप्रसंगी मंत्री बोलत होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उपसचिव सुनील हांजे, उपसचिव बी. आर माळी, उपसचिव अजित देशमुख, उपसचिव सुशिला पवार यांच्यासह वित्त, महसूल व क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री बनसोडे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळास व खेळाडूंना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात खेळाच्या पुरेशा सुविधा निर्माण करण्यासाठी क्रीडा विभागाने पुढाकार घेतला आहे.

प्रशिक्षण, खेळाच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंचा गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी केंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी हिताच्या योजना राबविण्यात येणार आहेत. क्रीडा क्षेत्रात राज्य अग्रस्थानी रहावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

यावेळी प्रस्तावित विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलास राज्य क्रीडा विकास समितीने प्रशासकीय मान्यता दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर स्मार्ट सिटी तर्फे प्रकल्प बाधित नागरिकांना ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून २८ सदनिकांचे आवंटन

Sat Oct 28 , 2023
नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अत्यल्प उत्पन्न गटातील २८ प्रकल्प बाधितांना नवीन नगर, पुनापूर पारडी येथे निर्माण करण्यात आलेल्या “होम स्वीट होम” च्या सदनिकांचे शुक्रवारी (ता.२७) ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून आवंटन करण्यात आले. अत्यंत पारदर्शी पद्धतीने प्रकल्पबाधितांनी स्वतः त्यांच्या सदनिकेची ईश्वर चिट्टी काढली. आता या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून, त्यांना सदनिकेची रजिस्ट्री करून दिली जाणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com