सिकलसेल समुपदेशन-आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

तामगाडगे ट्रस्टद्वारे लष्करीबाग परिसरात भव्य आयोजन    

‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ उपक्रम

नागपूर :- स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट तसेच अॅरोबिक रेमेडिज ऍण्ड फार्मासिटीकल प्रा. लि. नागपूरच्या सहकार्याेने कामठी रोडवरील लष्करीबाग, नवा नकाशा, दहा नंबर पुल येथील स्वस्तिक माध्यमिक विद्यालयात निशुःल्क सिकलसेल समुपदेशन, आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे तर सेवानिवृत्त अधिकारी विक्रम वानखेडे, शालिनी राऊत तसेच यश फाऊंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग जगताप यांची उपस्थिती होती. ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूंच्या मार्गदर्शनात सकाळी 11 ते सायंकाळी दुपारी 2 पर्यंत पार पडलेल्या या शिबीरामध्ये सिकलसेल समुपदेशन, मधुमेह तपासणी, बिपी माॅनेटरिंग, ई.सी.जी तपासणी व निःशुल्क औषध वितरणाचा लाभ कामठी रोडवरील लष्करीबाग, नवा नकाशा, दहा नंबर पुल परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

याप्रसंगी मुख्य अतिथी स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विशिष्ट समुदायातील अनुवांशिक आजार अशी ओळख असलेल्या सिकलसेल आजार हा हिमोग्लोबीमुळे लाल रक्त पेशींद्वारे आकार बदलल्यानंतर होत असतो. दुर्धर असलेल्या सिकलसेलबाबत लहानांपासून तर मोठयांना माहिती मिळावी या अनुशंगाने या शिबिराचे नागपूर जिल्हयातील जागोजागी आयोजन करण्यात असल्याचेही त्या म्हणाल्या. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात आयोजन समितीद्वारे उपस्थित मान्यवरांसह वैद्यकीय चमूंचे पुष्प देऊन त्यांचा सन्मान केले. यानंतर शिबिरार्थींना ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पत्र (फार्म) भरण्यात आले. या मागर्दशन पत्रकाद्वारे सिकलसेल रूग्णांची माहितीचे संकलन ट्रस्टद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक अमोल कांबळे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी

Sat Nov 19 , 2022
उपस्थितांनी घेतली प्रतिज्ञा अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले व उपस्थितांना एकात्मता दिवसाची प्रतिज्ञा दिली. जयंती कार्यक्रमाला आस्थापना विभागाचे उपकुलसचिव  मंगेश वरखेडे, तसेच विद्यापीठातील अधिकारी व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!