महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद

– 2 दिवसांत 2 लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिली भेट

–  गरजू विद्यार्थ्यांनी विविध योजनांची जाणून घेतली माहिती

गडचिरोली :- राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. महाज्योती द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उतुंग यश प्राप्त केले आहे.

राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. महाज्योतीच्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने 24 जुलै रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले यास्कॅनर कोडवर असलेल्या संकेतस्थळावर https://mahajyoti.org.in/schemes/ 2 लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी भेट घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. महाज्योतीद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामुळे महाज्योतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती ही एक क्लिक वर प्राप्त व्हावी याकरिता स्कॅनर कोड तयार करण्यात आले असून दोन दिवसांत 2 लाखांचा टप्पा संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी गाठला आहे. यामुळे महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आज उत्सूकतेने संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असल्याचा विश्वास राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत तयार केलेल्या स्कॅनर कोड द्वारे संकेतस्थळाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सैमसंग इंडिया ने नए एसी लॉन्च किए हैं जो ठंडे पानी पर आधारित हैं और इनमें विंडफ्री™ और 360 डिग्री ब्लेडलेस तकनीक है

Sat Jul 27 , 2024
· भारत में कमर्शियल कूलिंग सॉल्यूशन की दुनिया को बदलने के लिए तैयार · सैमसंग के विंडफ्री™ एसी अब ₹35,000 की शुरुआती कीमत में उपलब्ध हैं · उपभोक्ताओं की जरूरतों को ध्यान में रखते हुए चिल्ड वाटर फैन कॉइल यूनिट्स 3 अलग-अलग वैरिएंट्स में उपलब्ध हैं नेशनल :- भारत के सबसे बड़े उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स ब्रांड सैमसंग ने अपने नए विंडफ्री™ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com